Earphone Side Effects | आज-काल अनेक लोक अशी आहेत.ज्यांना गाणी ऐकायला खूप आवडतात. अगदी क्वचितच अशी माणसं असतील त्यांना गाणी आवडत नाही. ही गाणी ऐकताना , पिक्चर बघताना तसेच व्हिडिओ पाहताना आपण नेहमीच इयरफोनचा वापर करायला लागलेला आहोत. तो आवश्यक देखील आहे. कारण आपल्याला आजूबाजूच्या लोकांचा त्रास होत नाही आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा गाणी अगदी नीट ऐकू येते. परंतु तुम्हाला माहित आहेत का? या इयरफोनचे जसे चांगले फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम (Earphone Side Effects) देखील आहेत. आज आपण ईअरफोन वापरल्यामुळे आपल्या आरोग्याला काय हानी पोहोचू शकते हे जाणून घेणार आहोत.
बहिरे होऊ शकता
मोठ्या प्रमाणात जर तुम्ही इयरफोन (Earphone Side Effects)मधून गाणी ऐकत असाल किंवा व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्या कंपनामुळे कानांच्या नसावर दबाव येतो. त्यामुळे शिरा फुगतात आणि हळूहळू तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते. तुम्ही जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर तुम्ही बहिरे होऊ शकतात.
बहिरेपणाचे लक्षणे
- कानात शिट्टीचा आवाज येणे
- कमी ऐकायला येणे
- चक्कर येणे
- डोकेदुखी
- कान दुखणे
- चिडचिड होणे
इयरफोनच्या अतिवापराचे धोके | Earphone Side Effects
कानात इन्फेक्शन होते
तुम्ही जर सातत्याने इयरफोन वापरत असाल तर तुमच्या कानात घाण साचते आणि त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते. दुसऱ्याचे इयरफोन वापरल्याने देखील तुम्हाला इन्फेक्शन होते.
डोकेदुखी
इयरफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे व्यक्तीला डोकेदुखीचा त्रास होतो त्याचप्रमाणे कधी कधी मायग्रेन सही त्रास होतो.
हृदयविकाराचा झटका
आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत इयरफोन वापरत असाल, तर कानावर नाही तर तुमच्या हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके नेहमी उच्च राहतात आणि तुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. (Earphone Side Effects)
अनावश्यक ताण
हेडफोनच्या सततच्या वापरामुळे लोकांमध्ये तणाव आणि चिडचिडेपणा दिसून येतो त्यामुळे त्यांची शारीरिक स्वास्थ देखील बिघडते.
नुकसान टाळण्यासाठी काय करावे | Earphone Side Effects
- इअरफोनचा आवाज कमी ठेवा.
- बराच वेळ वापरू नका.
- तुमचे इअरफोन कोणाला देऊ नका किंवा दुसऱ्याचे इअरफोन वापरू नका. यामुळे संसर्गाचा धोका होऊ शकतो.
- नेहमी चांगल्या दर्जाचे इअरफोन वापरा.
- कानांसोबतच वेळोवेळी इअरफोन्सही स्वच्छ करणे गरजेचे आहे.
- झोपताना इअरफोन वापरणे टाळा.
- ब्लूटूथ चार्ज करताना अजिबात वापरू नका.