सातारा प्रतिनिधी । वैभव बोडके
महाराष्ट्राची भाग्यलक्षमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आज रविवारी पहाटे भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी 3 रिश्टेल स्केलचा हा धक्का जाणवला असल्याचे कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी सांगितले आहे.
खरं बघितलं तर पाटण तालुक्यात कोयना धरण परिसरात वारंवारं भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आजही पहाटे एक भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही वित्तहानी झालेली नाही. मात्र घराचे पत्रे हलत असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोयनेपासून उत्तरेस 5 किमी अतंरावर भूकंपाचा धक्का जाणवला. केंद्र बिंदू (इपिसेन्टर) अक्षांश 17° 27.0′ (उत्तर) आणि 73° 45.8′ (पूर्व) होताभूकंपाचा केंद्रबिंदू 30 किमी खोलवर झाला असल्याची नोंद झाली आहे.