कोयनानगर परिसराला भूकंपाचे धक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी |कोयना नगर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. कोयना धरणापासून दक्षिणेस गोषटवाडीपासून ९ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. तर हा केंद्र बिंदू जमिनीत ११ किलोमीटर खोलवर असल्याचे देखील शास्त्रज्ञानी म्हणले आहे.

काल  रात्री १२.२९ मिनिटांनी  ३.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे हादरे बसले. भूकंप रात्रीच्या वेळी झाल्याने परिसरातील लोकांमध्ये रात्रभर भीतीचे वातावरण होते. तर या भूकंपात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली आहे. 

कोयना नगर परिसर हा राज्यातील महत्वाचे भूकंप प्रवणक्षेत्र म्हणून गणले जाते. कोयना धरणाच्या बांधणी पासून या ठिकाणी जमिनीवर पाण्याचा वाढलेल्या दाबामुळे येथे भूकंप घडून येतात. सतत होत असणाऱ्या भूकंपामुळे हा भाग भूकंप प्रवण भाग म्हणून ओळखला जातो.

Leave a Comment