व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्यात “पुष्पा”वर खा. उदयनराजे फिदा… मित्रांसोबत राजलक्ष्मी थिएटरमध्ये कल्ला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभा खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी पुष्पा द राइज हा चित्रपटगृहात जावून मित्रासोबत पाहिला आहे. साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने खा. उदयनराजे भोसले यांनी भेट देत पुष्पा चित्रपट पाहिला. पुष्पा द राइज चित्रपट पाहिल्यानंतर खा. उदयनराजे यांनी कलाकाराचे काैतुक करत राजलक्ष्मी थिएटरलाही शुभेच्छा दिल्या.

दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जून आणि नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. या चित्रपटाने 400 कोटीच्यावरती बाॅक्सआॅफिसवर उडी घेतलेली आहे. दक्षिणात्य या चित्रपटाने मोठा धुमाकूळ घातला आहे. तेलगूशिवाय हिंदी भाषेसह चार भाषात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील गाण्यासह, संवाद आणि स्टोरीवरती अनेकजण फिदा झालेले आहेत. आता यामध्ये खा. छ. उदयनराजे भोसले हेही पुष्पावर चांगलेच फिदा झालेले पहायला मिळाले.

खा. उदयनराजे भोसले हे अनेकदा चित्रपटागृहात जातात. नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी ते नेहमीच चर्चेत असतात. सातारा येथील राजलक्ष्मी थिएटरमध्ये मित्राच्यासोबत खा. उदयनराजे यांनी पुष्पा हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या आठवणी मोबाईलमध्येही कॅमेऱ्यात कैद केलेल्या आहेत. त्यामुळे राजे चांगलेच पुष्पावर फिदा असल्याचे दिसून आले. त्याच्या स्टाईलची जिल्ह्यासह राज्यातील तरूणाईत मोठी क्रेझ आहे.