व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रेशनच्या यादीतून तुमचं नाव वगळले आहे?? ‘अशा’ प्रकारे घरबसल्या करा चेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेशनकार्ड म्हणजे देशातील गरीब लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. नागरिकत्वचा दाखला म्हणूनही रेशनकार्ड चा वापर केला जातो. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्ही रेशन कार्डमध्ये दिलेल्या माहितीचा वापर करू शकता.

जर कोणाकडे आधारकार्ड नसेल तर ती व्यक्ती त्याठिकाणी रेशनकार्ड वापरू शकते. पण काही वेळा काही त्रुटींमुळे रेशनकार्डच्या यादीतून आपलं नाव वगळले जाऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जर आपलं नाव रेशन कार्ड च्या यादीतून वगळले आहे की नाही ते कसं तपासाय हे आज आम्ही सांगणार आहोत.

अशा प्रकारे करा चेक-

रेशनकार्ड यादीत तुमचे नाव वगळले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx ला भेट द्या.

• यानंतर रेशन कार्डचा पर्याय निवडा.

• आता Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा.

• यानंतर राज्य आणि जिल्हा निवडा.

• जिल्ह्यानंतर ब्लॉकचे नाव टाका, त्यानंतर पंचायतीचे नाव निवडा.

• आता रेशन दुकानाच्या दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्डचा प्रकार निवडा.

• यानंतर तुमच्या समोर नावांची यादी येईल, जी शिधापत्रिकाधारकांची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव या यादीत पाहू शकता.

• जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुमचे नाव कापले गेलेले नाही. तुम्ही ही यादी डाऊनलोड देखील करू शकता.