Eating Eggs In Summer : उन्हाळ्यात अंडी खाणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eating Eggs In Summer) गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली आहे. अलीकडेच तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेले होते. दरम्यान उष्णतेचा वाढता पारा आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. शिवाय उन्हाळ्यात आरोग्यविषयक समस्यांचा सर्वाधिक धोका संभवतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यातही आपण आहारात काय खातोय आणि काय नाही? याकडे लक्ष देणे अत्यंत गरजचे असते.

उन्हाळ्यात उष्णतेच्या त्रासांपासून बचावासाठी खूप पाणी, थंड पेय आणि शरीराला आतून थंड ठेवतील असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. जो योग्य आहे. (Eating Eggs In Summer) पण यासोबत आपण आहारात काय खातोय? त्याचाही परिणाम शरीरावर होत असतो. जगभरात अंडी हा आहारात महत्वाचा वा मुख्य पदार्थ मानला जातो. मात्र अंडी उष्ण असतात आणि त्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्याने त्रास होतो असेही म्हटले जाते. दरम्यान उन्हाळ्यात अंडी खावी का नाही? याबाबतीत अनेक लोक कन्फ्युज असतात.

अंड्यामध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात. (Eating Eggs In Summer) प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असतात. पण तरीही गरमीच्या दिवसात अंडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते असा समज आहे. यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो असे काही लोक सांगतात. याबाबत तज्ञांनी काही महत्वाची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात अंडी खाण्याबाबत तज्ञांचे काय म्हणणे आहे.

काय म्हणाले तज्ञ? (Eating Eggs In Summer)

काही तज्ञ डॉक्टरांच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, ‘आपण उन्हाळ्यातदेखील अंडी खाऊ शकतो. याबाबत न्यूट्रीशियन अमिता गद्रे यांनी इंस्टावर पोस्ट शेअर करत म्हटलंय, ‘कोणत्याही इन्फ्लूअन्सरचे न ऐकता तुम्हाला काय वाटते ते समजून घ्या. उन्हाळ्यात आहाराबाबत सर्वात मोठी चूक तुम्ही करता ती म्हणजे पुरेसे पाणी न पिणे आणि फायबरयुक्त पदार्थ न खाणे’.

उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने काय फायदे होतात?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंड्यातील सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखे इलेक्ट्रोलाइट्सचे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. शिवाय अंडी प्रोटीनचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड मिळते. जे शरीरातील नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करतात आणि दिवसभर एनर्जी देतात. (Eating Eggs In Summer) शिवाय अंड्यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन ए, डी, बी१२ आणि लोह हे पोषक घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. त्यामुळे उन्हाळ्यातही अंडी खाणे फायदेशीर आहे.

तरीही उन्हाळ्यात अंडी खाण्याची भीती वाटत असेल तर काय खाल?

उन्हाळ्यात अंडी खाता येतील हे माहित होऊनही जर तुमचं मन मागे पुढे होत असेल तर अंडी खायलाच हवी अशी काही जबरदस्त नाही. त्याजागी तुम्ही वनस्पती आधारित प्रोटिन्स घ्या. जसे की मसूर, सोयाबीन, सॅलेड, बदाम, अक्रोड, जवस, दही आणि यीस्टसारख्या पदार्थांचे आवर्जून सेवन करा. (Eating Eggs In Summer)