हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकजनांना बोटिंग करायला प्रचंड आवडते. त्यासाठी लोक गोवा सारख्या ठिकाणी आपले सुट्ट्या सेलिब्रेट करण्यासाठी जातात. मात्र आता त्याची गरज भासणार नाही. कारण, कृष्णा पाटबंधारे प्रकल्पांतर्गत जावळी तालुक्यातील महू- हातगेघर धरणाला लागून असलेल्या जलाशयामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. पसरणी घाटातील या जलाशयामुळे अनेक पर्यटक हे येथे येऊन आनंद साजरा करत आहेत. येथे वाढणारी पर्यटकांची गर्दी पाहून येथे बोटिंग सुरु केल्यास त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो.
हे धरण पाहण्यासाठी पर्यटक पाचवड – कुडाळहून पाचगणीला जाणे पसंत करत आहेत. परंतु असे जरी असले तरी येथे बोट चालवण्यासाठी येथील स्थानिकांना प्रश्न आहे की, जर या जलाशयात पाणी सोडल्यास दीड टीएमसीमधील किती पाणी जलाशयात राहणार आणि आमच्या बोट कशा चालणार? पर्यटन कसे वाढणार? त्यामुळे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. यावर शासकीय पातळीवर नियोजन होणे गरजेचे आहे.
महिलांना होणार स्वयंरोजगारासाठी फायदा
या जलाशयामुळे अनेकांना फायदा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये स्त्रियांचाही समावेश असणार आहे. ज्यामुळे त्यांना स्वयंरोजगार मिळणार आहे. ज्यामध्ये नास्ता, छोट- छोटे स्टॉल टाकल्यामुळे याचा पर्यटकांनाही फायदा होणार आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. एवढेच नव्हे तर जलाशयाच्या प्रकल्पामुळे उद्योग व्यवसायातून परिसरातील युवक व नागरिकांची आर्थिक क्रांती होणार आहे.
काय होतील फायदे?
येथे बोटिंग सुरु झाल्यास पर्यटनास वाव मिळणार तर आहेच. मात्र त्याचबरोबर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. तसेच येथील विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. तसेच मासेमारी, बोटिंग व इतर व्यवसायाला चालना मिळेल. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जलाशय पाचगणीपासून केवळ ८ किलोमीटर अंतरावर असल्याने पर्यटक या ठिकाणीही भेट देऊ शकतील. येथील पर्यटन वाढवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे पर्यटन सेवा सहकारी विकास संस्था, महू, दापवडी पंचक्रोशी सहकारी पर्यटन संस्था, काँग्रेश्वर पर्यटन संस्था, दापवडी, अटल पर्यटन यासारख्या संस्था प्रयत्नशील आहेत.