हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरातील वाढत्या महागाईचा मोठा परिणाम सर्व सामान्य जनतेच्या आयुष्यावर पडला आहे. त्यामुळे सामान्य जनता फक्त आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींवरच खर्च करत आहे. मुख्य म्हणजे वाढत्या महागाईमुळे पुरुषांनी जर अंडरवेअर खरेदी करणे थांबवले तर त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर पडू शकतो. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, परंतु देशातील पुरुषांनी जर अंडरवेअर खरेदी करण्यावर पैसे खर्च केले नाही तर त्यामुळे देशात आर्थिक मंदी येऊ शकते. आणि ही मंदी सर्वात भयानक देखील ठरू शकते.
आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहित आहे की, देशातील वस्तूंवरील महागाईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक फक्त रोजच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टींवरच खर्च करत आहेत. यामध्ये कहर असा झाला आहे की, पुरुषांचे अंडरवेअर खरेदी करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. भविष्यात या प्रमाणात जर आणखीन वाढ झाली तर त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. पुरुषांनी अंडरवेअर खरेदी न करणे हे देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे ठरू शकते.
तज्ञांच्या संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, जर एखाद्या कोणत्या देशांमध्ये अंडरवेअरच्या विक्रीमध्ये घट झाली तर या कारणामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली जाऊ शकते. यापूर्वी 2007 ते 2009 दरम्यान अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीपूर्वी अंडरवेयरच्या विक्रीत घट झाली होती. या कारणामुळेच अंडरवेअरची घटती विक्री ही अर्थव्यवस्थेवर संकट आणणारे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी पुरुषांनी अंडरवेअर खरेदी करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान अॅलन ग्रीनस्पॅनच्या मते, पुरुषांच्या अंडरवेयर विक्रीचे आकडे हे एक महत्त्वाचे आर्थिक सूचक असतात. पुरुषांची अंडरवेअर ही सर्वात खाजगी कपडा आहे. मुख्य म्हणजे, अंडरवेअर ही लगेच निदर्शनात येणारी किंवा दिसणारी गोष्ट नाहीये. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाल्यानंतर किंवा महागाई वाढल्यानंतर पुरुष अंडरवेअर खरेदी करत नाहीत. मात्र याचा थेट परिणाम हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.