व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Pune Expressway वर तयार होणार 2 नवीन बोगदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पुणे महामार्ग (Mumbai Pune Expressway) हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असून यावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. हा महामार्ग ६ पदरी असून सणासुदीच्या काळात तर अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सध्याचा हा ६ पदरी महामार्ग ८ पदरी करण्याचा प्लॅन MSRDC करत आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी 2  बोगदे करण्यात येणार आहेत. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या DPR वर जितक्या लवकर सरकार दरबारातून मंजुरी मिळेल तितक्या लवकर ह्या रुंदीकरनाच्या कामाला गती मिळेल . मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway) वर 60,000 वाहने धावण्याची क्षमता असली तरी, सध्या या मार्गावरून 80,000 हून अधिक गाड्या धावतात. क्षमतेपेक्षा वाहनांची संख्या जास्त असल्याने आता लेन वाढविण्याची गरज आहे. हा महामार्ग ८ पदरी झाला तर मुंबई आणि पुण्याचे अंतर ह्या विस्तारीकरणामुळे 30 मिनिटांनी कमी होण्याची शक्यता आहे.

2500 कोटी रुपये खर्च- Mumbai Pune Expressway

ह्या महामार्गाचा खंडाळा घाट हा मिसिंग लिंक प्रकल्पाचा भाग म्हणून बायपास केल्यानंतर हे अंतर कमी होईल. आणि त्यामुळे इंधनाचीही बचत केली जाईल. दोन बोगदे तयार करण्यासाठी सुमारे 160 हेक्टर जमीन लागणार आहे. ही जमीन सध्या वनविभागाच्या ताब्यात असल्याने परवानग्या घेऊन लवकरच ती उपलब्ध केली जाईल. साधारणपणे मुंबई – पुणे एक्सप्रेसवेच्या रुंदीकरणासाठी 2500 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.