हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताच्या चालू आर्थिक परिस्थितीवर पी. चिदंबरम यांनी भाष्य केलं आहे. अर्थव्यवस्था आयसीयूत नाही, परंतु आयसीयूत ढकलले जाण्याची वाट पाहत आहे. ती अजूनही आयसीयूच्या बाहेरच आहे व असक्षम डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहे असा सणसणीत टोला भारताचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारला लावला आहे.
तसेच, रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी दिलेल्या इशाऱ्याचा दाखला देत त्यांनी म्हटले की, तुम्ही रघुराम राजन आणि अरविंद सुब्रमण्यम कसे सोडून जातील हे पाहिले, एवढंच नाहीतर अरविंद पणगरीया हे देखील जास्त काळ राहिले नाही. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांपासून मुक्त करण्याची गरज आहे, परंतु तुमचे डॉक्टर कोण आहेत?असा सवालही त्यांनी केला. नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी देखील सांगितले की, अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. तर, केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना लक्ष्य करणे सुरू केले, असेही चिदंबरम म्हणाले.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.