हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक हे पुनः एकदा ईडीच्या रडारावर आले आहेत. ईडी सरनाईकांची तब्बल ११ कोटींची संपत्ती जप्त करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास सरनाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.
NSEL घोटाळा प्रकरणात प्रताप सरनाईक यांची ११.४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. याशिवाय ईडीने त्यांचे ठाण्यातील २ फ्लॅट आणि मीरा रोडमधील जमिनीचे प्लॉट जप्त केले होते. या कारवाईविरोधात सरनाईक यांनी क्वाशी ज्युरीशरी बॅाडीकडे आव्हान दिले होते. मात्र, ईडीची जप्तीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे सरनाईक यांची जप्त केलेली संपत्ती ईडी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना ED चे समन्स; नेमकं काय आहे प्रकरण?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/xmtQrfQswg#hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 2, 2022
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप झाले होते आणि त्यांना ईडी चौकशीला सामोरे जावं लागलं होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आमदार प्रताप सरनाईक हे शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यामुळं त्यांची ईडी कारवाई टळणार असं विरोधकांकडून बोललं जात होते मात्र आता ईडीच्या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.