हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे.
ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामागील आर्थिक कनेक्शन तपासण्यासाठी हे प्रकरण ‘ईडी’कडे पाठविले जाऊ शकते. त्याचप्रमाणे आरोपांचे गांभीर्य समजून‘ईडीही’ स्वतःहून तपास करू शकते. परमबीर यांचा जबाब नोंदवून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. याबाबत विरोधी पक्षाकडून तक्रार नोंदवली गेल्यासही ‘ईडी’कडून हे प्रकरण हाताळले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप कडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून ठाकरे सरकार बॅकफूटवर गेले आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक बोलवली होती.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group