परभणीतही ईडी धडकली! खा .भावना गवळी संबंधीत कंत्राटदाराच्या घरी टाकली धाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | परभणी

भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी वाशीम यवतमाळ चा खासदार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत सक्तवसुली संचालनालयास दिलेल्या तक्रारी प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्या वाशिम व रिसोड येथील पाच कंपन्या ईडीने आज धाडी टाकल्या असुन नेमके याच दिवशी जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित एका कंत्राटदाराच्या घरी ईडीने तब्बल तीन तास झाडाझडती घेतली आहे .

एकीकडे ईडीने वाशिम ,रिसोड येथे धाडी टाकल्या असताना इकडे परभणी जिल्ह्यात
पाथरी शहरातील एक राजकीय व कंत्राटदार असणारे सईद खान उर्फ गब्बर खान यांच्या पाथरी शहरातील एकतानगर येथील बंगल्यावर दुपारी १.४५ वा. पासून पांढऱ्या रंगाची इनोवा व व्हॅन मधून आलेल्या ईडीच्या पथकाने झाडाझडती घेण्यास सुरुवात केली होती .

सूत्रांनी सांगितले माहितीनुसार या गाडीमधून वीस ते पंचवीस पथकातील कर्मचारी सदरील बंगल्यात तपासासाठी गेले होते . यामध्ये काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे . दरम्यान घरापासून ५० मीटर परिसरामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला होता .या ठिकांनी ईडीच्या नेमके काय हाती लागले ? हे मात्र कळू शकले नाही .
दरम्यान यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम व रिसोड येथील पाच कंपनी ठिकाणावर टाकण्यात आलेल्या धाडीचा संबंध याठिकाणी असल्याची चर्चा करण्यात येत आहे .परंतु यासंदर्भात कोणताही अधिकृत दुजोरा मिळत नाही .

Leave a Comment