हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राजकीय लोकांवर छापेमारी करणाऱ्या ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने आता आपल्या कारवाईचा मोर्चा वेगवेगळ्या कंपन्यांकडे वळवला आहे. ईडीने चायनीज मोबाईल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या भारतातील तब्बल 44 हुन अधिक कंपन्यांवर छापे टाकले आहेत. ईडीकडून या कंपनीविरोधात मनी लाँडरिंग प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.
ईडीच्यावतीने आज भारतातही झारखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल, मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणा सारख्या विविध राज्यांमधील चाययनिज कंपनींवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातही ईडीकडून विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. दरम्यान आता ईडीने चायनिज कंपनीवर विशेष कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ईडीची ही छापेमारी चायनिज कंपनींसाठी मोठी चिंतेची बाब बनली आहे.
यापूर्वी ‘या’ कंपन्यांवरही केली होती ED ने कारवाई
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयकर विभागाच्यावतीने वीवो, ओपो ,वनप्लस यांसारख्या 20 हून अधिक चिनी कंपन्यांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील चिनी कंपनीच्या वितरकांनी बनावट कागदपत्रे आणि खोटे पत्ते सादर केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. तसेच यापूर्वी ED ने Xiaomi या चायनिज कंपनीची 5500 कोटी रुपयांची बँक मालमत्ता फ्रीझ केली होती.