हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर इडीची छापेमारी सुरू आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना इडीची नोटीस आल्यानंतर शिवसेनेला अजून एक धक्का बसला असून शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थावर ईडीने धाडी टाकल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप भावना गवळी यांच्यावर केले होते. यासंदर्भात त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली होती. याचीच कारवाई म्हणून गवळी यांच्या पाच संस्थानांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या आहेत.
ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.