शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी इशारा दिल्यानंतर आज शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लॉडिंग प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली आहे. मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ईडीच्यावतीने करण्यात आलेल्या या धाड सत्रात मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी धाडकारवाई करण्यात आली आहे.