हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. यापूर्वी देखील अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र नियोजित कार्यक्रमांमुळे ते हजर राहू शकले नाहीत.
दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या प्रकरणात आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून अनिल परब यांना २० कोटी रुपये मिळाल्याची माहिती सध्या अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यानं ईडीला दिली होती. त्या आधारे ईडीनं मागील महिन्यात अनिल परब यांना समन्स बजावलं होतं.
दरम्यान, ईडीची पहिली नोटीस आल्यानंतर अनिल परब यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ”, असे अनिल परब यांनी म्हंटल होत.