Thursday, October 6, 2022

Buy now

मोठी बातमी!! संजय राऊत यांना ईडीचे समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडी चा समन्स आल्याने खळबळ उडाली आहे. पत्रा चाल जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडी चे समन्स आला आहे.

संजय राऊत यांना उद्याच ईडी कार्यालयात चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांची तब्बल 11 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रात राजकीय हालचाली वाढत असतानाच संजय राऊत यांना ईडी चे समन्स आल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे.  शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर संजय राऊत हे हल्लाबोल करत होते. संजय राऊत सातत्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारची बाजू जोरदार पणे लावून धरत असतात. आता खुद्द त्यांनाच ईडीचे समन्स आल्याने महाविकास आघाडी साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.