मुंबई । प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्यानंतर आता भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. अमित भोसले यांना मध्यरात्री पुण्याहून मुंबईला आणण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. बुधवारी ईडीने अविनाश भोसले यांच्या ‘अबिल हाउस’ या कार्यालयावर छापे टाकले.
फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची ‘ईडी’ने चौकशी सुरू केली आहे. बुधवारी दिवसभर ‘ईडी’चे अधिकारी कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करीत होते. परदेशातील खात्यामध्ये पैसे जमा केल्याच्या संशयावरून ‘ईडी’कडून तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मध्यरात्री तपासणी पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसंच, कार्यालयात सापडलेली कागदपत्रेही मुंबईला नेण्यात आली आहेत.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.