खाद्यतेलाच्या किंमती 20 टक्क्यांपर्यंत घसरल्याने जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

0
68
edible oil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सतत वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की,”देशभरातील किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या दरात किलोमागे 20 रुपयांपर्यंत मोठी घसरण झाली आहे.” सरकारचे म्हणणे आहे की,”आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमती जास्त असूनही, त्यांच्या हस्तक्षेपामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. वर्षभरापूर्वीच्या किमती जास्त असल्या तरी ऑक्टोबर 2021 पासून किमती सातत्याने कमी होत आहेत.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की,”167 कलेक्‍शन सेंटर्सच्या ट्रेंडनुसार, देशभरातील प्रमुख किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती 5-20 रुपये प्रति किलोने कमी झाल्या आहेत. आकडेवारीनुसार, शेंगदाणा तेलाची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 180 रुपये प्रति किलो, मोहरीचे तेल 184.59 रुपये प्रति किलो, सोया तेल 148.85 रुपये प्रति किलो, सूर्यफूल तेल 162.4 रुपये प्रति किलो आणि पाम तेल 128.5 रुपये प्रति किलो आहे.

‘या’ कंपन्यांनी किंमत केली कमी
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अदानी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्य तेल कंपन्यांनी प्रति लिटर 15-20 रुपयांपर्यंत किमती कमी केल्या आहेत. याशिवाय जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, हैदराबाद, मोदी नॅचरल्स, दिल्ली, गोकुळ री-फॉइल अँड सॉल्व्हेंट, विजय सॉल्व्हेक्स, गोकुळ एग्रो रिसोर्सेस आणि एनके प्रोटीन्स या कंपन्यांनीही किमती कमी केल्या आहेत.

आयात शुल्कात कपात आणि स्टॉक लिमिट लादण्यापासून दिलासा
सरकारचे म्हणणे आहे की, आयात शुल्कात कपात करणे आणि साठेबाजी रोखण्यासाठी स्टॉक लिमिट लादणे यासारख्या इतर उपायांमुळे सर्व खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती खाली आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व असल्याने देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भारत वापराच्या 60 टक्क्यांपर्यंत आयात करतो
भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. देशातील सुमारे 56-60 टक्के वापर आयात केला जातो. मंत्रालयाने सांगितले की,”जागतिक उत्पादनात घट आणि निर्यातदार देशांच्या निर्यात करात वाढ झाल्यामुळे खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती दबावाखाली आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमती आयात तेलाच्या किमतींवर ठरतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here