खुशखबर!!! खाद्यतेल झाले स्वस्त; किंमतीत मोठी घसरण

0
117
Palm Oil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्किल झालं असतानाच दुसरीकडे खाद्यतेल स्वस्त झाल्याने जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. देशातील प्रमुख खाद्यतेल कंपन्यानी खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरात घट आणि स्थानिक पातळीवरील खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता यामुळे हे दर कमी झाले आहे

देशातील प्रमुख खाद्यतेल उत्पादक कंपन्या अदाणी विल्मर आणि रुची इंडस्ट्रीज, जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया,
गोकुळ अॅग्रो रिसोर्सेज आणि एन. के. प्रोटीन, विजय सॉल्वेक्स, मोदी नॅचरल्स, गोकुळ री-फॉयल अँड सॉल्वेंट, या तेल उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

सूर्यफुल तेलाच्या किंमतीत 10 ते 15 रुपये प्रति लिटर तर सोयाबीन तेलाच्या किंमतीत 5 रुपये प्रति लिटर कपात करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती इंडियन वेजिटेबल ऑयल प्रोडयुसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर राव यांनी दिली. सूर्यफूल तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने तेलाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here