Whatspp वर Edit Button फीचर सुरु; आता Send केलेला मेसेज Edit करता येणार

Whatsapp Edit Button feature
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअँपचा वापर आपण एकमेकांना संदेश पाठवणे, व्हिडिओ आणि गाणी तसेच फोटो शेअर करणे यासाठी करत असतो. Whatspp सातत्याने आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असत. आता व्हाट्सअप आपल्या यूजर्स साठी एडिट मेसेज फीचर घेऊन आलं असून यामुळे आपण एकदा सेंड केलेला मेसेज एडिट करू शकता. सध्या काही बीटा चाचणी वापरकर्त्यांसाठी हे फिचर उपलब्ध करण्यात आले आहे.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp मेसेज एडिट बटण फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध झाले आहे. जगातील सर्व बीटा युजर्ससाठी कंपनी हे दमदार फीचर्स घेऊन आली आहे. व्हॉट्सअॅपने अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी एडिट बटण रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅपने या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅप वेबवर एडिट फीचर सादर केले होते, आता कंपनी हेच फिचर अँड्रॉइड यूजर्ससाठीही आणत आहे.

असा करावा लागेल मेसेज एडिट

यूजर्सना whatsapp च्या ओव्हरफ्लो मेनू मध्ये एक नवीन एडिट बटण दिसेल. मेसेज एडिट करण्यासाठी, यूजर्सना जो मेसेज एडिट करायचा आहे त्यावर काही वेळ बोट ठेऊन दाबून ठेवावे लागेल आणि नंतर उजव्या कोपर्याच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट वर क्लिक करावी लागेल. त्यानंतर मेसेज एडिट करण्यासाठी एडिट हा या ऑप्शन वर क्लीक करावी लागेल. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज एडिट कराल तेव्हा समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल केले आहेत.