नवी दिल्ली ।आपण फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटो (Zomato) वरून नियमितपणे फूड ऑर्डर केल्यास, एडिशन क्रेडिट कार्ड (Edition Credit Card) आपल्यासाठी एक उत्कृष्ट कार्ड असल्याचे सिद्ध होऊ शकते. हे एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे ज्यासाठी आरबीएल बँक आणि झोमॅटो यांनी हातमिळवणी केली आहे. या कार्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कार्ड धारकाला झोमॅटो प्रो (Zomato Pro) मेंबरशिप फ्री मिळते. तसेच, प्रत्येक झोमॅटो ऑर्डरवर 10% Edition Cash उपलब्ध आहे. हे कार्ड मास्टरकार्ड (Mastercard) स्वीकारणार्या सर्व मर्चंट आउट्लेट्समध्ये वापरले जाऊ शकते.
रिवॉर्ड्स पॉईंटसच्या ऐवजी मिळते Edition Cash
एडिशन क्रेडिट कार्डमध्ये रिवॉर्ड पॉईंटसच्या ऐवजी Edition Cash मिळते. हे वास्तविक पैशासारखे काम करते. झोमॅटो अॅप वापरुन आपण फूड ऑर्डरसाठी किंवा रेस्टॉरंट्ससाठी पैसे भरण्यासाठी Edition Cash वापरू शकता. या व्यतिरिक्त आपण आपले क्रेडिट कार्ड बिल सेटल काढण्यासाठी रिअल कॅश म्हणून वापरू शकता. येथे एका एडिशन कॅशचे मूल्य एक रुपयाच्या बरोबरीचे आहे.
एडिशन क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये
>> सर्व झोमॅटो ऑर्डरवर 10 Edition Cash मिळवा (रिवॉर्ड् रेट- 10%)
>> झोमॅटो वगळता सर्व ऑनलाइन खर्चावर 2 Edition Cash मिळवा (रिवॉर्ड् रेट- – 2%)
>> इतर खर्चावर 1 Edition Cash (रिवॉर्ड रेट – 1%)
>> या कार्डच्या माध्यमातून आपण वर्षातून 8 वेळा डोमेस्टिक एअरपोर्ट लाऊंजमध्ये प्रवेश करू शकता. तथापि आपण एका तिमाहीत जास्तीत जास्त 2 वेळा लाउंजमध्ये प्रवेश करू शकता.
>> या कार्डच्या माध्यमातून आपण वर्षामध्ये 2 वेळा आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश करू शकता.
>> BookMyShow च्या माध्यमातून दरमहा एक तिकिट खरेदी करा आणि दुसरे फ्री मिळवा. (जास्तीत जास्त 200 रुपये)
एडिशन क्रेडिट कार्ड शुल्क
>> या कार्डची वार्षिक फी 1499 रुपये आहे. मात्र, एका वर्षामध्ये अडीच लाख रुपयांना स्पर्श केल्यानंतर वार्षिक शुल्क पूर्ववत होईल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा