कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र राबविणार पंचसूत्री कार्यक्रम : पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक संपली

बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोरोना नियमांचं पालन आणि लसीकरण हा 5 सूत्री कार्यक्रम समजावून सांगितला. तसेच अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम राबवित जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले.

सबंध देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. ती नुकतीच संपली असून या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती आणि अभियानातील त्यांचा सहभाग हा महत्वाचा आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकित कोरोनापासून बचावासाठी देशभरात 6 ते 14 एप्रिल दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यात 100 टक्के मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता किती गरजेची आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत, तशी माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिलीय. राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्य सरकारने तयार केलेले नवे निर्बंध उद्यापासून लागू असतील, अशी माहिती मलिक यांनी दिलीय.

You might also like