औरंगाबाद – मयत वडिलांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल उपसंचालक कार्यालयात पाठवण्यासाठी 7 हजार रूपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक तुळशीराम आसाराम गायकवाड रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल ही कारवाई केली.
मयत वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उपचारासाठी झालेला खर्च वैद्यकीय प्रतिपूर्तीतून मिळावा यासाठी संचिका दाखल केल्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाठवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याकडून वरिष्ठ सहाय्यक गायकवाड हे 10 हजार रुपये मागत असल्याची तक्रार एसीबी कडे दाखल झाली. त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीने काल सकाळच्या सुमारास सापळा रचला.
माध्यमिक शिक्षण विभागात तडजोडी अंती गायकवाड यांनी पंचायत समोर 7 हजार रुपये लाच घेतात पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, अनिता एटुबोने यांच्या मार्गदर्शनात बाळासाहेब राठोड, साईनाथ तोडकर, विलास चव्हाण, चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने गायकवाडला रंगेहात पकडले.