पुणे : हॅलो महाराष्ट्र – विद्यार्थांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच दप्तराचं ओझ कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून एक नवीन घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षापासुन हा बदल आमलात आणणार आहे. पिंपरी चिंचवडमधील एका खासगी शिक्षण संस्थेच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घोषणा केली.
काय म्हणाले शिक्षणमंत्री ?
पुढील वर्षापासून पाठ्यपुस्तकामध्येच वह्यांची पाने जोडली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून करण्यात आली आहे. पुस्तकालाच वह्यांची पानं जोडल्यास दप्तराचं ओझं कमी होईल. याशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवल्यानंतर लगेचच नोट काढता येतील. ते त्यांना अधिक सोप जाईल, असं केसरकर यावेळी म्हणाले. यामुळे पुस्तकालाच वह्यांची पाने जोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांना वही विकत घेण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे पैशांची देखील बचत होईल.
सर्वेनंतर निर्णय
या निर्णयाबाबत माहिती देताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुढे म्हटलं की, पुस्तकात वह्यांची पानं जोडण्यात यावीत की नाही? याबाबत एक सर्वे करण्यात आला होता. या सर्वेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालकांचा प्रतिसाद पाहून आम्ही पुढील वर्षापासून पुस्तकालाच वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय घेतल्याचे केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय