टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावरुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाचे विधान केले आहे. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंत्री गायकवाड यांनी दिला आहे.

टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबत मंत्री वर्षा गायकवाड यांनी कारवाई करण्यात येणार असल्याचे ट्विट करीत माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हंटले आहे की, टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करू असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

तसेच या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी ह्या समितीद्वारे केली जाईल व अहवाल काही दिवसांतच सादर केला जाईल. कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक ते सहकार्य शालेय शिक्षण विभागाकडून केले जाईल, असेही मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Comment