बारावीची पुस्तकं आता बालभारतीच्या वेबसाईटवर; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारचा निर्णय

मुंबई । राज्यात लॉकडाउनमुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं महतवाची घोषणा केली आहे. बारावी अभ्यासक्रमाचे सर्व शैक्षणिक साहित्य ‘पीडीएफ’ स्वरुपात बालभारतीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांना डाऊनलोड … Read more

विद्यापीठ, महाविद्यालय अन् सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

मुंबई । राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च … Read more

मुंबई ते गुलबर्गा | ५५० किलोमीटर अंतरावरील आपल्या लहान मुलांपर्यंत पोहचण्याचा बिगारी कामगारांचा प्रवास पुण्यातच थांबतो…तेव्हा…???

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक बिगारी कामगारांची आबाळ झाली. अनेक मजूर रस्त्यावर आले. गुलबर्ग्याच्या बेनकीपली या गावातून ५ कुटुंब बांद्र्याच्या खेरवाडीमध्ये बिगारी कामासाठी आले होते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे काम बंद पडले. त्यानंतर २ दिवस कसेबसे मुंब‍ईत काढून आपल्या गावाचा रस्ता पकडून ते चालत निघाले.

स्पर्धा परीक्षा क्लास चालकांनी शुल्क कमी करावे अन्यथा क्लासचा कालावधी वाढवावा – आमदार रोहित पवार

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षार्थी यांच्या साठी स्पर्धा परीक्षा क्लासचालक यांना काही अंशी शुल्क कपातीसाठी आवाहन केले आहे.  सध्याच्या कठीण काळात आता प्रत्येक घटकांसोबत न्याय भूमिका घेणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात अनेक शेतकरी कुटुंबातील मुलं व मुली पुण्यात व अन्य ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मोठ्या संख्येने जातात. … Read more

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

प्रत्येक संकट हे संधी घेऊन येतं, ही संधी आहे जागतिक संकटाला सामोरं जाताना एकत्र यायची आणि मानवजातीला आवश्यक गोष्टींची मुक्तपणे एकमेकांसोबत देवाणघेवाण करण्याची. यासंदर्भातील हा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.

नॅशनल बुक ट्रस्ट (NBT)  “कोरोना स्टडीज सीरिज” सुरू करणार

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । नॅशनल बुक ट्रस्ट आता ‘कोरोना’ संबधित वाचकांच्या गरजा भागतील अशा सर्व वयोगटातील लोकांसाठीवाचन साहित्य पुरविण्यासाठी ‘कोरोना स्टडीज सीरिज’ नावाची प्रकाशन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध विषयात भारतीय भाषांमध्ये परवडणारी पुस्तके आणून वाचकांना “कोरोना ससंर्ग काळात” विविध बाबींसह तयार करण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी NBT ने योगदान देण्याचे ठरवले आहे. ‘कोरोना … Read more

MPSC वाल्यांना दिलासा, कोरोना प्रभावामुळे राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षांच्या तारखेत बदल

कोरोनाच्या वाढत्या भीतीने MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

पहिली ते आठवी परीक्षा रद्द; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर भूमिका घेत महामुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर ही मोठी शहरे बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. दरम्यान,  नववी व अकरावीचे … Read more

सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे आले धावून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोनाने थैमान घातलं असून फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे सरसावले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहेत. ३० जणांच्या या गटामध्ये काही विद्यार्थी हे डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूरमध्ये … Read more

आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षा स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका लक्षात घेता आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. आयसीएसई दहावीची परीक्षा ३० मार्चला तर बारावीची परीक्षा ३१ मार्चला संपणार होती. मात्र आता १९ ते ३१ मार्च या कालावधीतले पेपर लांबणीवर पडले आहेत. आयसीएसई बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून … Read more