प्रेरणादायी ः PSI च्या वर्दीत मुलाला पाहून आई- वडिल लागले ढसाढसा रडायला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पीएसआय पदाचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर वर्दी आणि त्याबरोबर मिळालेले स्टार ओपन करण्यासाठी आलेल्या आपल्या मुलाला पाहून आई- वडिल ढसाढसा आनंद आश्रू ढाळू लागले. हेळगांव (ता. कराड, जि. सातारा) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील अमोल शिवाजी सुर्यवंशी हा पीएसआय परिक्षेत पास झाला आहे. परिक्षेसाठी फिजिकल तयारी करण्यासाठी पैसै नसल्याने भंगार, विट- वाळू, सिंमेट यासारखे साहित्य गोळा करून शारीरिक व्यायामाचे साहित्य तयार केले होते. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अमोलने १०० पैकी १०० गुण मिळवत प्रेरणादायी यश मिळविले आहे.

पीएसआय पदाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्दी परिधान करून मिळालेला स्टार हा आई- वडिलांच्या हस्ते आोपन करण्याचा खात्याचा नियम आहे. स्टार ओपनिंगचा सामुदायिक सोहळा ट्रेनिंग नंतर ट्रेनिंग सेंटरवरच प्रत्येकाच्या आई-वडिलांना बोलून साजरा करण्यात येतो. परंतु यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टार ओपनिंगचा सोहळा रद्द करण्यात आल्यामुळे प्रत्येक कॅंडिडेटला आपापल्या घरी जाऊन, मिळालेली खात्याची वर्दी पपरिधान करून आपल्या आई-वडिलांच्या हस्ते स्टार ओपन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

येथून जवळच असलेल्या तारगाव नजीक कृष्णा नदीकाठी आपल्या वडिलांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिराच्या आवारात अमोलने कसलाही डामडौल न करता  जवळच्या चार मित्रांसोबत आई-वडील आणि मामा – मामी  यांना घेऊन.  आपला स्टार ओपनिंगचा सोहळा साजरा केला. मंदिराच्या पाठीमागे जाऊन आपल्याला मिळालेली पीएसआय पदाची वर्दी परिधान करून अमोल आई-वडिलांच्या समोर येताच आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू  तरळले. उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या गरीब परिस्थितीशी झगडत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील अमोल शिवाजी सूर्यवंशी याने पोलीस खात्यातील पीएसआय पद मिळविले. वर्दीतील अमोलला पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात अक्षरश: आनंदाश्रू आले.

लोकसेवा आयोगामार्फत २०१७ साली राज्यातील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या ६५० जागांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मुख्य पदासाठी दहा हजार एकतीस  उमेदवारांची निवड झाली होती. त्यातील लेखी परीक्षा, शारिरीक चाचणी आणि मुलाखतीसाठी २ हजार ७६३ उमेदवार पात्र ठरले होते. पात्र उमेदवारांच्या मुलाखती ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये झाल्या होत्या. अमोलने आपल्या अभ्यासाच्या जोरावर राज्यात ३८ वा क्रमांक मिळविला होता. त्यानंतर एक वर्षाच्या अंतराने सहा जानेवारी 2020 ला ट्रेनिंगसाठी नाशिकला बोलवण्यात आले होते. पीएसआय पदाचे पंधरा महिन्याचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून अमोल सध्या गावाकडे आला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment