सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर फुटपाथवर झोपण्याची वेळ

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी येथे शुक्रवारी सैन्यभरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय झाल्याने त्यांना फुटपाथवर झोपण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे. योग्य नियोजन न झाल्याने हजारोंच्या संख्येने इथे आलेल्या उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे. पहील्याच दिवशी परिक्षार्थींना भर थंडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याने हजारो उमेदवारांची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा … Read more

ओव्या गात, गाणी म्हणत चिमुकल्यांकडून सावित्रीबाईंना अभिवादन

सावित्रीबाई फुले यांची जयंती मुर्शीतपुर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लहान मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा साकारली होती.

 महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा; पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

स्त्री शिक्षणाचा पाय रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी महिलांसाठी उद्योजगता प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा पार पडली.

कल्पनेचे उद्योगधंद्यामध्ये रूपांतर करणे आवश्यक – डॉ. जेरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम केंद्राद्वारे आयोजित क्लस्टर लेव्हल ‘इनोव्हेशन 2 एंटरप्राईज’ (आय २ ई) स्पर्धेचे उद्घाटन केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाचे चीफ इनोव्हेशन ऑफीसर डॉ. अभय जेरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

मोदी-शहांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी जखमी झालेत, पोलिसांची हाणामारी संपेना, आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होतेय…तरीसुद्धा..

या आंदोलनाची तीव्रता उत्तर प्रदेशमधील अलिगढ युनिव्हर्सिटी, दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी या ठिकाणी वाढली असून या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.

यशवंतराव चव्हाण आणि खाशाबा जाधवांच्या शाळेला १०० वर्ष पूर्ण

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि पहिले ऑलम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले. त्या कराड शिक्षण मंडळाचे २०२०-२०२१ हे शताब्दी वर्ष साजरे केले जाणार असल्याची माहिती कराड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी दिली.

गावात बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखाच्या केबिनमध्येचं भरवले कॉलेज

कोल्हापुरातील शाहू मैदान ते नंदगाव या मार्गावरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागतं. मात्र गावात बसचं येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखाच्या कार्यालयातच कॉलेज भरवत अनोखं आंदोलन केलं आहे. संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आलं.

अमरावती विद्यापीठात मूल्यांकनासाठी तब्बल ८१० परीक्षक

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन विभागात पेंडालमध्ये परीक्षकांकडून मूल्यांकनाची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. काल म्हणजेच शुक्रवारीतब्बल ८१० परीक्षाकांनी उपस्थिती लावली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात परीक्षकांनी उपस्थिती दर्शविल्याने पेंडालदेखील मूल्यांकनास कमी पडला असल्याचे निदर्शनास आले.

सोशल मिडियावर व्हायरल झालेले रल्वे भरतीबाबतचे ‘ते’ परिपत्रक फेक

दिल्ली | RRB NTPC Admit Card 2019, Exam Date आरआरबी नॉन-टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (एनटीपीसी) श्रेणी -१ च्या परीक्षेचा तपशीलासंदर्भातील एक परिपत्रक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. मात्र सदर परिपत्रक हे फेक असल्याचा दावा आता रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांनी केला आहे. तसेच परिक्षार्थींनी अशा फेक जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रेल्वे भरती मंडळाकडून करण्यात आले … Read more