10 वी, 12 वी च्या परिक्षा ‘या’ तारखेला होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र आता राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे.

त्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या दरम्यान होणार असल्याचे जाहीर झाल आहे.तर बारावीच्या परीक्षेचा निकाल हा अंदाजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येइल अस सांगितल जात आहे.

तर दुसरीकडे दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल2021 ते 31 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार असून दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like