चंदीगड । अमृतसर-अटारी-वाघा सीमेवरील इंटिग्रेटेड चेकपोस्ट (ICP) द्वारे अफगाणिस्तानातून होणारी ड्राय फ्रूटची आयात अशरफ घनी सरकार पाडून तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर थांबली आहे. भारत पंजाबच्या अटारी सीमेवरून दरवर्षी अफगाणिस्तान मधून सुमारे 50 कोटी किमतीच्या ड्राय फ्रूटची आयात करतो. एक प्रमुख ड्राय फ्रूट आयातदार बी.के. बजाज म्हणाले की,” सरकार बदलल्यानंतर सरकारी कार्यालये बंद आहेत, ज्यामुळे व्यवसाय ठप्प झाला.” ते म्हणतात की,” त्यांनी काबुलमधील व्यापाऱ्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला आणि त्यांनी आश्वासन दिले की, एकदा कार्यालये सुरू झाली की व्यवसाय पुन्हा सुरू होईल.”
ते म्हणाले की,” त्यांना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे, तालिबान आंतरराष्ट्रीय वैधता मिळवण्यासाठी कार्यालये चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.” तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याच्या काही दिवस आधीच भारताच्या वनस्पती संरक्षण, संगरोध आणि संचय संचालनालयाने काही तांत्रिक कारणांमुळे ड्राय फ्रूटची आयात थांबवली होती. अलीकडेच या समस्येचे निराकरण झाले आणि पाकिस्तानच्या विविध भागात अडकलेले ट्रक रोज भारतात येत होते. काल सुमारे नऊ ट्रक JCP तून गेले.
एका मीडिया रिपोर्टनुसार, भारत स्थानिक बंदरातून अफगाणिस्तानला निर्यात करत नाही. 4000 कोटी ते 5,000 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या एकेकाळच्या संपन्न बंदराचा व्यवसाय 27 कोटी रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे या बंदरात जिथे सुमारे 1,400 कुली काम करत होते तिथे आता 70 पेक्षा कमी लोकं मजुरी करतात.