सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
येळीव गावाच्या सर्वागिण विकासासाठी वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम व पुसेसावळी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे मत वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी व्यक्त केले.
येळीव (ता. खटाव) येथे सुनीता कदम यांच्या जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या खंडोबा मंदिर ते जि. प. शाळा रस्ता डांबरीकरण करणे आणि ग्रामपंचायतीसाठी पाण्याची टाकी बांधणे आदी विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच रेश्मा जाधव, उपसरपंच केशव जाधव खरशिंगेचे सरपंच दिनकर शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य अल्ताफ शेख, धनश्री घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विक्रमशील कदम म्हणाले, येळीव परिसरातील रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवने गरजेचे आहे. या गावातील तरुण कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठ पुराव्यामुळे सुनीता कदम यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. गावचा विकासा करण्यासाठी तरुण पिढीला बरोबर घेऊन काम करु, येळीव गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता सत्ता असो वा नसो सतिश कारखान्याच्या माध्यमातून विकास करण्यात येईल.
तरी या कार्यक्रमास रुक्मिणी जगताप,नवनाथ जगताप, अमोल घाडगे, सचिन जाधव,पोपटराव जाधव, दीपक घार्गे, धनाजी जाधव, पोपट मोकाशे, विनोद चव्हाण,सतिश जाधव, बागवान, शुभांगी जगताप,योगेश भोसले, नितीन मोरे युवक, ग्रामस्थ, महिला वर्ग आदी उपस्थित होते.