कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडच्या विमानतळाच्या वीस किलोमीटर परिघातील क्षेत्रात बांधकाम उभारणीसाठी निर्बंधाच्या अटीबाबत अद्यापही स्पष्टता नाही. कराडच्या विकासासह बांधकाम व्यवसायासह परिणाम होत असेल तर या अटीमुळे परिसराच्या विकासात कोणतीही बाधा होणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असे अश्वासन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
विमानतळामुळे वीस किलोमीटच्या अटीचा कराडच्या विकासावर परिणाम होत असल्याची गोष्ट लक्षात घेवून पालिका, क्रेडाई संस्थेचे पदाधिकऱ्यांनी ती अट शिथील करण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेवून बैठक घेतली. पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपाध्यक्ष जयवंत पाटील, नगरसवेक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, महेश कांबळे यांच्यासह क्रीडाईचे अध्यक्ष महेश पाटील, सतीश यादव, नितीन काटू यांच्यासह पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. यावेळी क्राडीईतर्फे निवेदनही देण्यात आले.
विमानतळ प्राधिकरणाचे दिल्ली येथील वरिष्ठ अधिकारी श्री. बन्सल यांच्याशी आमदार चव्हाण यांनी चर्चा केली. त्यावेळी विमानतळाच्या त्या आदेशाबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याची बाब समोर आली. आमदार चव्हाण म्हणाले, विमानतल प्राधीकरणाकडेही त्याबाबत सविस्तर माहिती नाही. त्या आदेशाची अधिक स्पष्टता यावी, यासाठी अन्य वरिष्ठांशी बोलून त्याचा निर्णय घेवू.