व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे बंगलोर महामार्गावर भीषण अपघातात ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे; नक्की ‘असं’ काय घडलं?

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड नजीक रविवारी पहाटे पावने सात वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघाताची घटना घडली. कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडशी गावातून गुळ भरुन कराडला जात असताना गोटे गावच्या हद्दीत ट्रॅक्टरचा पुढील भाग अचानक महामार्गावर पडला. नेमके याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून जात असलेली आयशर गाडी धडकली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या सुमारास कराड तालुक्यातील खोडशी गावातून ट्रॅक्टर (क्रमांक MAN 8157) व ट्राॅली (क्रमांक MH 50 C 7128) यामधून चालक गुळ भरुन कराडला घेऊन जात होता. गोटे गावच्या हद्दीत ट्रॅक्टर आला असता अचानक ट्रॅक्टरचा पुढील भाग महामार्गावर तुटून पडला. नेमके याचवेळी ट्रॅक्टरच्या पाठीचा मागून आयशर गाडी (क्रमांक MH 11 AL 5626) हि जात होती. तीही अचानकपणे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. या विचित्र अपघातात ट्रॅक्टरचाल किरकोळ जखमी झाला आहे.

या घटनेनंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी याची माहिती महामार्ग पोलिसांना दिली. नागरिकांच्या माहितीनंतर तत्काळ त्या ठिकाणी महामार्ग पोलिसांनी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने ट्रॅकटरचे मोडून पडलेले दोन भाग महामार्गावरून बाजूला केले. याप्रकरणी महामार्ग देखभाल विभागाचे इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सलीम देसाई, अमीत पवार व कराड शहर पोलिस स्टेशनचे प्रशांत जाधव, खालीद इनामदार, पांडुरंग चव्हाण, दत्ता पाटील खोडशी यांनी मदत केली.