व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हफ्ता लवकरच जाहीर होणार! आपले नाव लिस्टमध्ये असल्याची अशाप्रकारे करा खात्री!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये केंद्र सरकार देते. जर आपणही या योजनेचे लाभार्थी असाल आणि आपणाला जाणून घ्यायचे असेल कि, आठव्या हफ्त्यातील रक्कम तुम्हाला मिळेल की नाही. तर आपण आपले नाव सरकारच्या लिस्टमध्ये चेक करू शकता.

सर्वप्रथम आपण पीएम किसानच्या वेबसाईटवर https://pm.kisan.gov.in वर जाऊन उजव्या साईटवरती ‘फार्मर कॉर्नर’च्या विकल्पवरती क्लिक करा. त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस असा ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज खुले होईल. नवीन पेजमध्ये आधार नंबर किंवा बँक खाते अथवा मोबाईल नंबर यापैकी कुठलाही ऑप्शन निवडा. तीन पर्याय पैकी एका पर्याय निवडून, आपण आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही हे जाणून घेऊ शकता. पर्याय निवडल्यानंतर ‘गेट डेटा’ वरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपणाला सर्व ट्रांजेक्शन’ची माहिती मिळू शकणार आहे. आठव्या हफ्त्याच्या बाबत सर्व माहिती आपणाला येथूनच मिळू शकणार आहे.

किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाते. दोन हजार रुपयांचा एक हप्ता अशी त्याची रक्कम आहे. दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पाठवले जातात. पहिला हप्ता एप्रिलमध्ये दिला जातो. दुसरा हप्ता ऑगस्ट- नोव्हेंबरमध्ये आणि तिसरा हफ्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.