शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे ‘जय वीरू’ची जोडी

Shinde - Fadnvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडीचे अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी (Amruta Fadanvis) या दोघांच्या जोडीला जय वीरूची जोडी अशी उपमा दिली आहे.

आज कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाविषयी बोलत असताना त्यांच्या कामाचेही त्यांनी कौतूक केले. यावेळी त्यांनी या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी (Amruta Fadanvis) शोले चित्रपटातील जय विरु या दोघांची जोडी ज्या प्रमाणे आहे. त्याच प्रमाणे शिंदे आणि फडणवीस यांची जोडी असल्याचे म्हंटले आहे.

यावेळी त्यांनी वारकरी आपले दैवत आहेत, तेच आपले अन्नदाता आहेत असंही त्यांनी सांगितले आणि त्यांच्याविषयी कृतज्ञतादेखील त्यांनी (Amruta Fadanvis) व्यक्त केली. एकादशीसारख्या उत्सवामुळे आपले राज्य वेगळे असल्याचे सांगत त्यांनी आपला महाराष्ट्र संपन्न आणि समृद्ध व्हावा अशी अपेक्षासुद्धा व्यक्त केली. अमृता फडणवीस यांनी शिंदे आणि फडणवीस यांना जय वीरुची उपमा दिल्यामुळे त्यांच्या या वाक्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय