एकनाथ खडसेंची शिवसेनेला युतीधर्म पाळावा म्हणून वॉर्निंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात उभे आहेत. पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मातोश्रीकडून तो अद्याप स्वीकारल्या गेला नाही आहे. याच कारणावरून एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले असून शिवसेनेला वॉर्निंग दिली आहे.

निवडणूक प्रचारा दरम्यान पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले की,’ मी वाट पाहत आहे कि मातोश्री केव्हा बंडखोर उमेदवार पाटील यांचा राजीनामा स्वीकार करते. पदावर राहून जर बंडखोरी होत असेल तर ही बाब चिंतनीय आहे. आणि याचे परिणाम भाजप-सेना युतीवर नक्की होणार. तेव्हा सेनेनं युती धर्म पाळावा. अन्यथा याचे परिणाम वाईट होतील.’ असे वार्निंग वजा आवाहन त्यांनी शिवसेनाला केले.

खडसे पुढे म्हणाले की, ‘राज्यात जेथे-जेथे सेनेचा उमेदवार उभा आहे तेथील माझे कारकर्ते मला याबाबत प्रश्न विचारात आहेत. जर शिवसेनेने तुमच्या विरुद्ध मुद्दाम बंडखोर उमेदवार उभा केला असेल तर आम्ही सेनाला मदद करणार नाही असे त्यांनी मला सांगितले आहे.’ तेव्हा खडसे यांच्या वॉर्निंगला मातोश्री काय प्रतिसाद देते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment