एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांची भेट; सीमावादावर नेमकी काय झाली चर्चा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी एकत्रित चर्चा करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. मात्र, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची विमानतळावर भेट झाली असून दोघांच्यात सीमावादावर चर्चाही झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गुजरातमध्ये शपथविधीसाठी गेले होते. यावेळी दोघे अहमदाबादमधील विमानतळावरून निघाले असता त्यांची विमानतळावरील लाऊंजमध्ये भेट झाली. या दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मु्द्दा गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. कानडिगांकडून महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र पु्न्हा आक्रमक झाला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. दोघांच्यात नेमकी कोणती आणि काय चर्चा झाली? यासह अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.