हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील नेत्यांच्या बंडखोरीची आजही खूप चर्चा होताना दिसत आहे. खुद्द कधी एकनाथ शिंदे तर कधी शिंदे गटाचे काही आमदार बंडखोरीबाबत बोलून दाखवतात. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीबाबत मोठे विधान केले आहे. “आम्हीही 3 महिन्यांपूर्वी जे महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमट आहेत. आम्ही जगभरात फेमस झालो आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
मुंबईमधील षण्मुखानंद हॉलमध्ये अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाचे 12 हजार 500 प्रयोग पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशांत दामले यांना “तुम्ही नेहमीच ताजेतवाने दिसता. इतकी ऊर्जा कुठून आणता असे विचारले. त्यावर प्रशांत दामले यांनी “माझी एनर्जी रसिक प्रेक्षकांकडून येते” असं सांगितले.
यावेळी शिंदे यांनी आम्हीही 3 महिन्यापूर्वी महानाट्य केले होते. त्या नात्याचे आजही पडसाद उमटत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी ठाण्यात चित्रनगरी उभारणारअसल्याची घोषणा केली. मुंबई आणि ठाण्याच्यामध्ये एक चित्रनगरी उभारणार आहोत. त्यामुळे कलाकारांना मोठं व्यासपीठ उपलब्ध होईल. कलेला वाव देण्यासाठी कलाकारांच्या पाठिशी आहोत, असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.