एकनाथ शिंदेंची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद; स्पष्ट करणार भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे 25 आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. काल रात्री उशिरापासून शिंदे गुजरात येथील हॉटेल मध्ये आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत.

एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता सुरत येथून पत्रकार परिषद घेतील आणि आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर होणार का? की शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार हे पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काहीच आलबेल नसल्याची चर्चा सुरू होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

कालच विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले. शिवसेना आणि समर्थक अपक्ष आमदारांची 12 मतं फुटल्याचं विधान परिषद निवडणुकी स्पष्ट झालं आहे. त्यातच आज एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे.

Leave a Comment