हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ढाल तलवार ही मराठमोळी निशाणी आहे, आता परफेक्ट काम झालंय असं त्यांनी म्हंटल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खरं तर आम्ही सूर्य या चिन्हाला पहिली पसंती दिली होती. परंतु, निवडणूक आयोगाने आम्हाला ढाल-तलवार हे चिन्हं दिलं. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. ढाल तलवार ही मराठमोळी निशाणी असून ती छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी आहे. त्यामुळे आता परफेक्ट काम झालंय.
सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंशी चर्चा; काँग्रेसचा जाहीर पाठिंबा
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/MqvLCmPKR2#hellomaharashtra @INCMaharashtra @ShivSena
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2022
आमची शिवसेना हि बाळासाहेबांची शिवसेना आहे. बाळासाहेबाचें विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. त्यामुळे या राज्यातील लाखो लोक आमच्या सोबत आहेत. आमची शिवसेना ही सर्वसामान्य लोकांची शिवसेना आहे आणि आमच्या समोरचे जे आहेत ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला