ईडीच्या भीतीने कुणीही आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आणि शिंदे गटात ईडीचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकजण शिंदे गटात व भाजपमध्ये सामील होत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याने त्या आरोपांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी राऊतांवरील कारवाईचे समर्थनही केले. “कोणी भाजपमध्ये बोलावलं आहे का? कोणी जर ईडीच्या भीतीने आमच्याकडे येत असेल किंवा भाजपामध्ये जात असेल तर त्यांनी जाऊ नये, असे शिंदे यांनी म्हंटले.

मुख्यमंत्री शिंदे शनिवारपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत, रोज सकाळी 9 वाजता ते प्रसार माध्यमांसमोर येऊन संवाद साधतात. ते आमच्यावर ईडीचा आरोप करत आहेत. सध्या राऊतांची चौकशी सुरू आहे. त्यांना अटक कधी होईल हे मला माहित नाही, कारण मी काही ईडी अधिकारी नाही. ईडीची चौकशी होऊ द्या. राऊत म्हणाले, मी काही केलं नाही. राऊत जर असे म्हणत असतील तर मग कर नाही त्याला डर कशाला. चौकशीत जे काय आहे ते सत्य बाहेर येईलच, असे शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्हाला दबाव टाकून कोणालाही आमच्या सोबत घ्यायचे नाही. अर्जुन खोतकर असो की कोणीही असो, ईडीच्या कारवाईला घाबरून भिऊन, दडपणाखाली कुणीही असं पुण्याचं काम करू नये. आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं सगळं झालं. ज्या घडामोडी पाहिल्या आहेत. त्यात एक तरी सुडाची कारवाई पाहिली का? आमच्यावर ईडीचा दबाव होता म्हणून आम्ही शिंदे गटात गेलो असे आतापर्यंत एका तरी आमदारांनी सांगितले का? अस सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.