हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मलाच मुख्यमंत्री करायचं होतं मात्र नंतर कोणी काय सांगितले माहीत नाही पण नंतर मला कळलं तर उद्धव ठाकरे यानांच मुख्यमंत्री व्हायला सांगितले आहे अस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक इनसाईड स्टोरी सांगितली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात भाषण करताना आपला एकूण राजकीय प्रवास सांगितला. त्यावेळी त्यांनी 2019 ला महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबत किस्सा सांगितला. शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये मला मुख्यमंत्री करणार होते. पण आम्हाला सांगितले गेले की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी कोणीतरी सांगितले आहे. आम्ही म्हणल ठीक आहे. पण नंतर एक दिवस अजितदादा बोलता बोलता मंत्रालयात बोलुन गेले की आमचा तुम्हाला विरोध असल्याचं कारण नाही, तो तुमच्या पक्षाचा निर्णय होता अस म्हणत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
येवडच नव्हे तर 2014 ला फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री मिळणार होत पण मला माहित होतं की, मला उपमुख्यमंत्री करावं लागेल म्हणून शिवसेना हे पद घेणार नाही. पण मी गप्प राहिलो. मला mmrda चे खात दिलं. पण मी त्या खात्याला न्याय दिला आणि समृद्धी महामार्ग सारखा ड्रीम प्रोजेक्ट सुरू केला. त्यावेळी माझ्यावर टीका झाली, माझे पुतळे जाळले पण मी घाबरलो नाही असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.