हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज पुन्हा एकदा नव्याने सुनावणी पार पडत आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोर शिंदे गटाचे 1 पत्र वाचून कोंडी केली आहे. भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदी निवडीच्या पत्राचा संदर्भ देत कामत यांनी त्यांच्या नियुक्तीला आव्हान दिलं आणि शिंदे गटाला खिंडीत गाठलं आहे.
शिंदे गटानं गुवाहाटीमधून पक्ष प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. याबाबतचं शिंदे गटानं सादर केलेलं पत्र आज देवदत्त कामत यांनी कोर्टासमोर वाचून दाखवलं. त्या पत्राच्या शेवटी ‘शिवसेना विधिमंडळ पक्ष’ असा उल्लेख केला गेला असल्याचं देवदत्त कामत यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे मुख्य प्रतोदची निवड राजकीय पक्ष करू शकतो की विधिमंडळ गट हा मुद्दा उपस्थित झाला आहे.
शिंदे गटाने दिलेलं पत्र राजकीय पक्षाचं नसून विधीमंडळ पक्षाचं आहे. व्हीपचा आदेश फक्त पक्ष देऊ शकतो असं देवदत्त कामात यांनी म्हंटल. आणि शिवसेनेचं नेतृत्त्व कोणाकडे आहे हे २०१८ च्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या पत्रातून निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं आहे असा मोठा युक्तिवाद करत देवदत्त कामत यांनी शिंदे गटाची कोंडी केली आहे.