वाढीव वीज बिला विरोधात गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी । भिवंडी विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना विविध पक्षांचे उमेदवार मत मागण्यासाठी रॅली काढतायेत. त्यातच तालुक्यातील केवणी – दिवे गावात वाढीव वीज बिलाविरोधात महिला व नागरिकांनी रॅली काढून मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या घोषणा दिल्या. तसेच वीज पुरवठा आणि वीज बिल वसूल करणाऱ्या टोरंट कंपनीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यान ग्रामीण भागात उमेदवारांना चांगलाच शॉक बसला आहे.

संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत यावर तोडगा काढला गेला नाही, तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिलाय. या अगोदरही अनेक वेळा या कंपनी विरोधात आंदोलन केली होती.

वाढत्या वीजबिलावर काही तोडगा काढला नाही तर वागळे इस्टेट भागातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल. असा इशाराही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. मात्र यावर काही तोडगा न निघाल्यानं नागरिकांना अजूनही वाढीव वीजबिल भराव लागत आहे. त्यामुळं संतापलेल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या घोषणा देत रॅली काढली.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment