प्रतापगड कारखान्याचा निवडणूक प्रचाराचा कुडाळमध्ये शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कुडाळ येथे आज सकाळी झाला. संस्थापक- सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी श्री गणेश व श्री पिंपळेश्वर-वाकडेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरुवात केली आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महिगाव याठिकणी कार्यकर्त्यांनी सभा आयोजित केली होती.

सभेला मार्गदर्शन करताना संस्थापक-सहकार पॅनलचे उमेदवार म्हणाले की, कारखाना निवडणूक नाईलाजास्तव लागलेली आहे. आपण सर्वजण कै. लालसिंगराव (काका) व कै. राजेंद्र शिंदे (भैय्या) यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या विचाराचे आहोत. सर्वांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी निवडणूक यशस्वीरित्या जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करू असा ठाम विश्वास कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

जावळीतील जनतेच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कै. लालसिंगराव (काका) व कै. राजेंद्र शिंदे (भैय्या) यांनी खूप हाल अपेष्टा सहन करून हा साखर कारखाना निर्माण केला आहे. त्यामुळे आम्ही सर्व उमेदवार त्यांचे वारस, जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ (बाबा) शिंदे यांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक यशस्वीरित्या जिंकून कारखाना लवकरात लवकर कसा चालू होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. अशी ठाम भूमिका यावेळी उमेदवारांनी व्यक्त केली.