पुणे प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागणार असून ऑक्टोबरमध्ये मतदान पार पडणार आहे असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
नवनीत राणा भाजपच्या वाटेवर ; अमित शहांची घेतली भेट
पुणे दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी चिंचवड येथील कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विधान सभा आणि लोकसभा या दोन्ही वेगळ्या निवडणुका आहेत. त्यामुळे लोकसभेच्या विजयाने तुम्ही उराळून जाऊ नका. आता कामाला लागा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
विधानसभेला अजित पवारांना पराभूत करण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात
शिवसेना भाजपमध्ये ५०-५० टक्के जागा वाटून घ्यायच्या हे जरी ठरले असले तरी जागांच्या वाटाघाटी वेगळ्या देखील होऊ शकते असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सभागृहनेते एकनाथ पवार आदी नेते उपस्थित होते.