नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येनं कोरोनाबाधित आढळत आहेत. दरम्यान, काही दिवसांमध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. साहजिकच निवडणूक आयोगाकडूनही याची तयारी सुरू आहे.त्यानुसार, कोरोना काळात निवडणूक कशी घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली जारी केल्या आहेत.
गाइडलाइन्सनुसार उमेदवारांना आता ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. निवडणूक काळातील कामादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. कोरोना काळात डोर टू डोर कँपेनिंग करताना उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त 5 लोकांना नेऊ शकणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सभा आणि रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”