अमेठी (उत्तर प्रदेश ) | कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आपला अंतिम निर्णय सुनावला आहे. राहुल गांधी यांनी संप्तीच्या दिलेल्या माहितीवर आणि दाखल केलेल्या व्यक्तिगत माहितीच्या प्रतिज्ञापत्रावर अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांच्या कडून आक्षेप घेण्यात आला होता.
Amethi returning officer declares Congress President Rahul Gandhi’s nomination valid. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/Io0WZYQoLX
— ANI UP (@ANINewsUP) April 22, 2019
निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकार्यांनी या संदर्भातील आपला अंतिम निर्णय सुनावत राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यामुळे राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी अमेठी सोबत डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या केरळमधून देखील निवडणूक लढत आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा मतदार संघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत.
राहुल गांधी यांच्या समोर अमेठीतून केंद्रीय वस्त्रोदोग मंत्री स्मृती इराणी निवडणूक लढवत आहेत. तर राहुल गांधी यांना अपक्ष उभा राहून आव्हान देणारे ध्रुवलाल यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी आपल्या शिक्षणाच्या बाबत निवडणूक अर्जात योग्य उल्लेख केला नाही. तसेच सादर केलेले प्रतिज्ञापत्र अमेठी एवेजी दिल्ली मध्ये बनवण्यात आले आहे. या अक्षेपांना निवडणूक आयोगाने धुडकावून लावात राहुल गांधी यांची उमेदवारी वैध ठरवली आहे.
महत्वाच्या बातम्या
माढा : भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका : मराठा क्रांती मोर्चा
Breaking | कोल्हापूर अर्बन बँकेला या तंत्राचा वापर करून ६७ लाखांचा गंडा
भाजपच्या उमेदवाराच्या अडचणीत वाढ ; धमकी दिल्याचा गुन्हा दाखल
राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ला भाजप कडून असे उत्तर..
शरद पवार यांनी यशवंतरावांना फसवलं – उद्धव ठाकरे